घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कनगर येथे विविध उपक्रम

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : तालुक्यातील कनगर गावचे कर्तव्यदक्ष सरपंच सर्जेराव गोरक्षनाथ घाडगे यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

श्री. घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भाऊसाहेब दिवे, राजेन्द्र दिवे, संजय पावसे, सौ. छायाताई दुशिंग, पोपटराव नालकर, केशवराव गोरे, महमदभाई इनामदार, संदीप घाडगे, बाळासाहेब गाढे, सुदर्शन दिवे, श्रीराम घाडगे, गोरक्षनाथ नालकर, अजिजभाई शेख, रामदास दिवे आदि नागरिकांनी नारळाची झाडे देणगी स्वरूपात देऊन सरपंच यांचे हस्ते ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. त्याच बरोबर तरुण उद्योजक रवि वरघुडे यांनी वडाची झाडं देऊन त्याची सरपंच व ग्रामस्थ यांच्या हस्ते गाव तळ्याच्या भरावला लागवड करण्यात आली. तसेच वरघुडे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी कामगार तलाठी अंकूश सोनार, ग्रामविकास अधिकारी एन एम पवार, उपसरपंच बाबा गाढे, भगवान गाडगे, आण्णासाहेब गाढे, दिपक घाडगे, मच्छिंद्र वरघुडे, यशवंतराव जाधव, धोंडीराम जाधव, भारत खाटेकर, बाळासाहेब शिंगाडे, दिपक गाढे व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या