कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या वर्षपूर्तीनिमित्त सत्कार सोहळा संपन्न
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधन सभागृहात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या वर्षपूर्तीनिमित्त व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या प्रभारी कुलगुरु पदी त्यांची झालेली निवड या निमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक सुखदेव बलमे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात डॉ. शरद गडाख, सुखदेव बलमे, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. मिलिंद ढोके, डॉ. सी.एस. पाटील व डॉ. तानाजी नरुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कुलगुरुंना नविन पदभाराबद्दल शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना डॉ. पाटील म्हणाले की राज्यातील अग्रगण्य असलेल्या राहुरीच्या कृषि विद्यापीठाचा कुलगुरु म्हणुन कार्यरत असल्याबद्दल अभिमान वाटत आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून विद्यापीठाचे मानांकन उंचविण्यासाठी प्रयत्न करु या. विद्यापीठ आर्थिक बाबतीत स्वंयपूर्ण होण्यासाठी महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुलगुरु डॉ. पाटील पुढे म्हणाले की सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे. वर्षभरात कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण कार्यात राबविलेल्या विविध संकल्पनेतून यापुढे कार्य करायला उर्जा मिळेल.
अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ यांनी प्रास्ताविक करुन सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या