स्टार एन्टरप्रायजेसचा भव्य उद्घाटन सोहळा

संगमनेर शहर : निमगाव बु येथील काही तरुणांनी एकत्र येत एक योजना तयार केली आहे. त्यात भरघोस बक्षीस ही ठेवली आहेत. सदर योजनेतून उपलब्ध होणारा निधी हा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रावर खर्च करण्यात येणार आहे.

या योजनेतून सामान्य माणसाला फायदा कसा होईल यांचा अभ्यास करून योजना तयार केल्याची माहिती स्टार एन्टरप्रायजेस च्या संचालकांनी दिली आहे. स्टार एन्टरप्रायजेस कार्यालय उद्घाटन समारंभ दि.-६  जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९:०० वा , श्री नानासाहेब कानवडे व्यापारी संकुल निमगाव बु ता.-संगमनेर या ठिकाणी होणार आहे.

तरी सदर कार्यालयाच्या उद्घाटन समारंभा साठी सर्वांना स्टार एन्टरप्रायजेस च्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या