शेवगाव/ प्रविण भिसे : शिवरायांची युद्धनीती बुद्धिकौशल्य आणि राजनीती या सर्वांचा संगम स्वराज्य उभे करण्यासाठी शिवरायांनी केला. त्यामुळे मराठ्यांचा इतिहास उभा राहिला. छत्रपती शिवराय जगासाठी प्रेरणादायी आहे, शिवरायांचे पुतळे आणि स्मारक उभे होतीलच मात्र त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविणे हीच खरी शिवरायांना आदरांजली असे मत ह.भ.प शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांनी व्यक्त केले.
स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने ह भ प चंद्रकांत महाराज लबडे यांना मराठा भूषण पुरस्कार 2021 नुकताच भातकुडगाव ता. शेवगाव, जि. अहमदनगर येथे स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी कल्याण महाराज काळे बोलत होते.
याप्रसंगी डॉ. कृषिराज टकले म्हणाले की मराठा समाजाने राजकीय हेवेदावे विसरून एकत्र यावे. मराठा समाजाची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, हा स्वाभिमानी मराठा महासंघाचा हेतु आहे. जगाला संरक्षण देणारे छत्रपती शिवराय आज त्यांच्या पुतळ्याचे संरक्षण करण्याची वेळ येते, शिवरायांचे पुतळे बसविण्यासाठी परवानगी मागावी लागते, हीच मोठी शोकांतिका आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांनी केले.
या प्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, अनिल महाराज वाळके, ताराभाऊ लोढे, रावसाहेब कावरे, गणेश झगरे आदिंची भाषणे झाली. प्रास्ताविकात स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर म्हणाले की, चंद्रकांत लबडे यांचे शिव अभिषेकच्या कार्याची दखल घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघाने आणि त्यांना मराठा भूषण पुरस्कार दिला आहे. चंद्रकांत महाराज लबडे म्हणाले मराठा समाजातील तरुणांना दिशा देणारी स्वाभिमानी मराठा महासंघ एकमेव संघटना आहे. या सोहळ्याचे सुत्रसंचालन जिल्हा संघटक रोहित मोटकर व मुकुंद जमदाडे यांनी केले.
यावेळी शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे, तालुका कार्याध्यक्ष शरद थोटे, युवक तालुका कार्याध्यक्ष प्रवीण भिसे, संजय अकोलकर, सुदाम थोरे, निलेश काजळे तसेच भातकुडगाव, दहिगावने शंकर वारुळे गुरुजी, रांजणी मोरे पाटील, मठाचीवाडी जगदाळे पाटील, शेवगाव पाथर्डी खरडगाव आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. अनिल चिकणे यांनी मानले.
0 टिप्पण्या