संगमनेर शहर : छावा क्रांतिवीर सेनेचा ८ वा वर्धापन दिन, छावा मराठा संघटनेचा २८ वा वर्धापन दिन तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व छावा मराठा संघटना प्रदेशाध्यक्ष विलासराव पांगारकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा पांगरी ता.-सिन्नर येथे पार पडला.
वर्धापन दिन व वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, कोव्हिड लसीकरण असे उपक्रम राबवण्यात आले. तसेच यावेळी मराठा आरक्षणसाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांचा मराठा रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कला क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरी केल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील जादूगार रिया कानवडे हिला श्रीलंका स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन मराठा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबोधीत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या