श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या (सन २०२१-२०२६ ) चेअरमन, व्हाईस चेअरमन ची निवड सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी.रूद्राक्ष व संस्थेचे सहसचिव ॲड. जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज बिनविरोध संपन्न झाली.
चेअरमनपदी बाळासाहेब चंद्रभान बनकर आणि व्हाईस चेअरमनपदी अशोक भिमनाथ कटारे यांची निवड करण्यात आली. एस.पी.रूद्राक्ष यांनी पतसंस्थेच्या सर्व निवडी बिनविरोध झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सहसचिव ॲड. जयंत चौधरी यांनी या सर्व निवडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व संस्थेचे सचिव अविनाशजी आदिक यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली तसेच गव्हनिँंग कौन्सिल सदस्य आणि नूतन संचालक मंडळ यांच्या सहकार्याने झालेल्या असुन बिनविरोध निवडीची परंपरा चालु ठेवल्याबद्दल नवीन आदर्श सर्वांसमोर ठेवल्याचे नमुद केले.
याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक संजय शिंदे, विष्णू राऊत, शामराव तऱ्हाळ, विजय थोरात, बाळासाहेब वमने, मंदाकिनी खाजेकर, सुभाष पटारे, विलास कुलकर्णी, सुभाष काळे, संगीता घोडे, मुदस्सिर सय्यद, संदिप बोरूडे, नवनाथ बर्डे, सचिव संतोष दांडगे आदि उपस्थित होते.
नुतन पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या चेअरमन पुष्पाताई आदिक, अध्यक्ष प्रा.डॉ. बबनराव आदिक, सचिव अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व सर्व गव्हरनिंग कौन्सिल सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या