राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील माहेगांव येथील अंगणवाडी सेविका यांनी आमदार लहुजी कानडे यांच्याकडे रस्त्याची मागणी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
येथील अंगणवाडी सेविका जनाबाई झारेकर, शकुंतला गोसावी, अर्चना राव, मदतनीस जुबेदा शेख,सुरेखा झारेकर, रंजना खंडागळे,यांच्यासह बाळासाहेब कुर्हे, जालिंदर आढाव, बबन कुलट, दिलीप शेरकर, बाबासाहेब हापसे, अण्णासाहेब नवघरे आदी ग्रामस्थांनी आमदार लहुजी कानडे यांच्याकडे रस्त्याची मागणी केली आहे.
"हानुमानवाडी येथील अंगणवाडीकडे जाणारा शाळेचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने या शाळेत विद्यार्थी व पालकांना येणे मुश्कील होत आहे.आमदार लहुजी कानडे यांनी निवेदनाचा विचार करून तातडीने रस्त्याची समस्या दुर करावी."
अर्चना राव
अंगणवाडी सेविका माहेगांव
0 टिप्पण्या