सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध गटविकास अधिकारी यांना क्रांतीसेनेचे निवेदन

कळमनुरी - ग्रामपंचायत कार्यालय उमरदरा वाडी येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध गटविकास अधिकारी पंचायत समिती कळमनुरी यांना आज रोजी अखिल भारतीय क्रांतीसेना जिल्हा अध्यक्ष राजू पाटील गौळकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कळमनुरी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गावातील पाण्याची समस्या, गावात प्राथमिक आरोग्य ही समस्या, महिला बचत गटासाठी जागा उपलब्ध करून देणे या आदींच्या मागण्यासाठी गावातील महिला व बचत गटाच्या महिलांनी राजू पाटील गौळकर अखिल भारतीय क्रांतीसेना यांच्या नेतृत्वाखाली, आरती स्वयंसहाय्यता बचत गट, गौरी स्वयंसहायता बचत गट, मातोश्री स्वयंसहाय्यता बचत गट, प्रगती स्वयंसहाय्यता बचत गट, पुना स्वयंसहायता बचत गट, अशा स्वयंसहाय्यता बचत गट, उज्वला स्वयंसहायता बचत गट, हिरकणी स्वयंसहायता बचत गट आदी बचत गटाचे समूह व अखिल भारतीय क्रांतीसेना जिल्हाध्यक्ष राजू पाटील गोळकर, पार्वती पोटे, छाया कडे, सुमन बर्गे,लक्ष्मीबाई मरकळ, रेणुका मिराशे ,निर्मला धुमाळे, संगीता बर्गे, गोदाबाई मिराशे, संगीता बर्गे, चंद्रकला बर्गे, रेखा मिराशे, संगीता बर्गे, बर्गे सयाबाई, डाखोरे सत्वशीला, द्रोपदा धनवे, सत्वशीला धनवे, शशिकला धनवे, संगीता धनवे, सुलतान इमाम ,येडाबाई धनवे, ताई खिल्लारे, विमल धनवे ,सुमन करोडे, धुरपता बर्गे, गौरी शेख, लक्ष्मीबाई मोरे, विजय मला धनी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या