निकृष्ट दर्जाचे धान्य वाटपाविरोधात क्रांतीसेनेचा आवाज

कर्जत प्रतिनिधी : तालुक्यातील नेटकेवाडी व धांडेवाडी येथील रेशनकार्ड धारकांना निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त मोठे खडे व माती मिश्रीत धान्य वाटप करण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार रेशनकार्ड धारकांनी क्रांतीसेनेच्या कर्जत पदाधिकारी यांच्या कडे केल्यानंतर याची माहिती घेवुन आज कर्जत येथे प्रांत कार्यालय तसेच तहसील कार्यालयात याबाबत प्रांताधिकारी अर्चना नष्टे मॅडम व तहसीलदार किरण सावंत साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.

   रेशन वर दिले जाणारे धान्य यात मोठे खडे व माती मिश्रीत आहे.अशा भेसळयुक्त मोठे खडे असलेल्या व माती मिश्रीत धान्यामुळे रेशनकार्ड धारकांची फसवणूक झाली आहे.अशा धान्य वाटपामुळे गरीबांना दिलेल्या धान्यात मोठ्या प्रमाणात खडे असल्याने महिनाभर जाणारे धान्य हे यावेळी महिन्याच्या आधी संपणार असल्याने रेशनकार्ड धारकांपुढे पेच निर्माण झाला आहे.त्यात तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे व लोकांना रेशनच्या धान्याची गरज असल्याने येथील रेशनकार्ड धारकांना चांगल्या गुणवत्तेचे व स्वच्छ धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.यावेळी नेटकेवाडी येथे वाटण्यात आलेल्या धान्याचे नमुने देण्यात आले.या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ही करण्यात आली.
      यावेळी निवेदन देताना क्रांती सेनेचे कार्याध्यक्ष सुभाष दरेकर,कर्जत तालुकाध्यक्ष सुनिल धांडे, उपाध्यक्ष गोकुळ नेटके, संपर्क प्रमुख आशिष देशमुख, युवा अध्यक्ष शब्बीर शेख, तालुकाध्यक्ष साजन शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या