निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा स्नेहमेळावा; हनुमंत पवारांचे व्याख्यान


राहुरी : निर्भय, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अधिवेशन निमित्ताने पत्रकारांचा मेळावा प्रसिद्ध विचारवंत हनुमंत पवार यांचे व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची निमित्ताने असणार आहे. पत्रकारांच्या विविध समस्यांप्रती मेळाव्यात उहापोह होणार असून पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले व सचिव राजेंद्र म्हसे यांनी केले आहे.

नगर-मनमाड महामार्गावरील ग्रामीण भागातील चिंचोली शिवारातील केशव फार्म येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी प्रसिद्ध विचारवंत हनुमंत पवार यांचे 'लोकशाही राष्ट्रात ग्रामीण पत्रकारांची भूमिका' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रसंगी चिंचोली परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करत असलेल्या व्यक्तींचा सन्मान तसेच ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी मेळाव्यात उहापोह होणार आहे.

अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शोभाताई लाटे तर आ. प्राजक्त तनपुरे, आ. हेमंत ओगले, नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, कोल्हार चे सरपंच सुरेंद्र खर्डे, राहुरीचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज, पत्रकार राजेश जाधव, किशोर गायकवाड, वंचितचे राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

सदरच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक राहुरी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक, राहाता तालुकाध्यक्ष सुभाष कोंडेकर, राहुरीचे उपाध्यक्ष प्रमोद डफळ, सचिव दिपक मकासरे, राजेंद्र पवार, रमेश जाधव, दिनेश गायकवाड, मनोज साळवे, दिपक साळवे, समीर शेख, युनुस शेख, आप्पासाहेब मकासरे सह पत्रकार बांधवांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या