श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “सामाजिक जीवन गौरव पुरस्कार” जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव पोखरकर यांना बुधवारी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक व पेन्शनरांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला. हा पुरस्कार राजन लाखे, डॉ. सुवर्णा चव्हाण तसेच प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ईंद्रसिंग राजपूत, पुणे जिल्हा समन्वयक दिलीप कहाणे, उत्तर महाराष्ट्र संघटक बापूराव बहिरट, सुरेश कटारिया, बाबासाहेब चेडे, संपतराव मुठे, दत्तात्रय पटारे, बशीर बेग, भारत छल्लारे आदी मान्यवर व पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना सुभाषराव पोखरकर यांनी हा सन्मान समाजकार्याला मिळालेली प्रेरणा असल्याचे सांगत सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या