कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनालीताई झेंडे या उपस्थित होत्या, तर रोहिणीताई पांडुरंग कदम यांनी प्रमुख पाहुण्यांची भूमिका बजावली.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥
या वाक्याप्रमाणे ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो, तेथे सकारात्मकता व प्रगती नांदते. आई-वडिलांचा अभ्यासातील सहभाग वाढल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावते, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
समारंभादरम्यान महिलांनी आपापला परिचय करून दिला, पारंपरिक उखाणे घेत कार्यक्रमात रंगत आणली. महिलांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लिंबू-चमचा व संगीत खुर्ची अशा मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दोन्ही स्पर्धांतील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी सुरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दत्तात्रय कडूस यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ लोंढे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षीय भाषणात मनालीताई झेंडे यांनी महिलांचे भरभरून कौतुक करत, शाळेच्या भौतिक विकासासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हर्षा अभय कार्ले, रिता संतोष लंके, सारिका सुनील झेंडे, वृषाली दादा गायकवाड, राजेश्वरी दत्तात्रय झेंडे, सुप्रिया विजयसिंह पाटील, शुभांगी गोरख लंके, सुप्रिया शेखर लंके, रेखा धनंजय झेंडे, काजल जनार्दन भदार्गे तसेच शाळेच्या उपाध्यापिका ज्योती पवार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास रेश्मा सुरज तांबोळी, शाहेदा परवीन सादिक तांबोळी, अंजुम सादिक तांबोळी, प्रियांका विनोद झेंडे, मोहिनी गणेश लंके, माया सोमनाथ भदार्गे, अनिता सचिन झेंडे, सुनिता संजय लंके, सीमा सोमनाथ लंके, स्वाती केशव झेंडे, सीमा नामदेव झेंडे, मनीषा मंजाबापू झेंडे, रोहिणी गणेश टकले, अपेक्षा गणेश झेंडे, संगीता बाळासाहेब सोनवणे, राणी योगेश बोखारे, सुरेखा बोखारे, विमल वैजिनाथ मोहिते, रुपाली तुकाराम गायकवाड, सुनिता अशोक घोंगडे, शामल सचिन झेंडे, मोहिनी संजय खळदकर, सुनिता देशमुख, सुवर्णा गणेश इंगळे, पूजा सतीश सकट, वर्षा सोन्याबापू कांबळे यांच्यासह अनेक माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा व खेळांचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी माता-पालकांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत, भविष्यात आणखी खेळ व उपक्रम घेण्याची विनंती केली. उपस्थित सर्व माता-पालकांचे स्वागत रविराज चौरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0 टिप्पण्या