बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या, जखमी झालेल्या कुटूबियांना भाजप व छावाची सांत्वनपर भेट

संगमनेर शहर : तालुक्यातील निमगाव खु येथे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या मीराबाई रामभाऊ मेंगाळ यांच्या कुटुंबातील सदस्यांची व जखमी झालेल्या जिजाबाई वसंत कातोरे यांची भाजपा प्रदेश सदस्य रविंद्र थोरात यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह भेट घेतली.

यावेळी वन विभागाच्या वनपाल सौ संगीता कोंडार व त्यांचे कर्मचारी देखील उपस्थित होते. यावेळी सदर उपाययोजनांचा आढावा घेत रविंद्र थोरात यांनी संबधीत अधिकारी वर्गांना काही सुचना केल्या तसेच राज्याचे महसूलमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून लवकरच शासकीय मदत दोन्ही कुटूंबाला मिळुन देण्याचे आश्वासन देत तसे समंधीत अधिकाऱ्यांना सुचना देखील दिल्या.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष संदिप राऊत, सतीश गोपाळे, प्रणिण कडलग, सावरचोळ सरपंच अनिताताई कानवडे, भाजपा युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष सागर कानवडे, सावरचोळ वि वि कार्य सेवा सो चेअरमन शरद कानवडे, संपतराव कानवडे, तुकाराम कानवडे,

   राज्याचे महसुल, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः यात लक्ष घातले असुन संबधित विभागाला सुचना देखील दिल्या आहेत. येत्या काही दिवसातच कुटूंबाला शासकीय मदत दिली जाईल.
 _ रविंद्र थोरात; प्रदेश सदस्य भाजपा किसान मोर्चा

    फक्त मंत्री नेते येणार म्हणुन फोटो काढण्यासाठी त्यांच्या सोबत येणाऱ्या प्रतिनिधी सारखे आम्ही नाही. लवकरच पीडित कुटूंबाला शासन दरबारी मदत मिळवून देऊ.
_ आशिष कानवडे; जिल्हाध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना अहमदनगर

सुदाम पिंगळे, पोपट चौधरी, नवनाथ मेंगाळ, भीमराव पिंगळे, शंकर मेंगाळ, संदिप मेंगाळ, गोरख मेंगाळ, भाऊसाहेब मेंगाळ, रंगनाथ कडाळे, बाळासाहेब कातोरे, नाथु कातोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या