ओला दुष्काळ जाहीर करून 50 हजार रुपयांचे अनुदान द्या- राहुरी प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

राहुरी तालुक्यातील सोयाबीन व इतर पिके अति प्रमाणात पडलेल्या पावसामुळे उपळून गेली. याकडे सत्ताधारी व विरोधकांचे दुर्लक्ष...

राहुरी - सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, घास, कांदा पिके उपळून चालले असून ऊसालाही मोठ्या प्रमाणात हुमनी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कृषी अधिकारी व तलाठी यांना सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन प्रती एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली.

पुढे बोलताना श्री लांबे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना सांगितले की, गेली दोन वर्षापासून अतिवृष्टी, कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन व शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेला दूध व्यवसाय दुधाला भाव नसल्यामुळे तोट्यात गेला. त्यात रासायनिक खते, बी बियाणे, डिझेल, पेट्रोल, कृषी औषधे, पशुखाद्य यांच्या किमंती गगनाला भिडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे पवार सरकार यांनी शेतकऱ्यांना कुठलेच अनुदान दिले नाही. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी ही झालेली नाही.
राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील...

अशा परिस्थितीत चालू वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, घास, कांदा, ऊस व फळबागा हे सर्व पिकांची लागवड केली असून सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके हे उपळुन चालले आहेत. म्हणून महाराष्ट्र राज्यामंध्ये नवीनच स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने नुसत्या घोषणा करन्यापेक्षा महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावे व प्रति एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामंध्ये त्वरित जमा करुन कष्टकरी शेतक-याला आधार द्यावा, अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या