राहुरी/ बाळकृष्ण भोसले - लोकशाहीत ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत जनमाणसांमधून लोकप्रतिनिधी निवडून जात असतात. त्यांनी जनसामान्यांचे मूलभूत प्रश्न समजावून घेऊन सोडविले पाहिजेत हे लोकशाहीला अभिप्रेत असते. त्यानुषंगाने मिळालेल्या पदाला योग्य न्याय देवून समाजाप्रती समर्पित वृत्ती असणारे लोकप्रतिनिधी तयार व्हायला हवेत. चिंचोली गावाला नेमके असे नेतृत्व मिळाले असून हे नेतृत्व आता गावात न राहता तालुका पातळीवर गेल्यास तालुक्यातील समाजातील सर्व घटकांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल असा आशावाद साईबाबा संस्थानचे विश्वस्त व प्रेरणा उद्योग समुहाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार चिंचोलीचे लोकनियुक्त सरपंच गणेश इंद्रभान हारदे यांना मिळाला. त्याबद्दल त्यांचा चिंचोली व पंचक्रोशीतील नागरिकांनी नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
प्रसंगी व्यासपीठावर श्रीरामपूर मतदार संघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रसिद्ध उद्योजक दिलिपतात्या जगताप, मुळा प्रवरेचे संचालक दिपक पाटील, तनपुरे कारखान्याचे संचालक महेश पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक अशोक गागरे आदी मान्यवर उपस्थित होते. चिंचोली व परिसरातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, प्रेरणा मल्टिस्टेटच्या वतीने उपाध्यक्ष विष्णुपंत वर्पे, राष्ट्रवादीचे किरण कडू, राजेंद्र लोंढे आदींसह मान्यवरांनी श्री हारदे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी बोलताना आ.कांबळे म्हणाले, गणेश हारदे यांची ओळख एक समाजसेवक अशीच सरपंच होण्या अगोदरपासून आहे. ती ओळख कायम राखण्याचे काम त्यांच्याकडून आजही होताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात लोक घरी बसले असताना माञ सरपंच हारदे यांचे रूग्णसेवेचे काम अहोरात्र सुरू होते. त्यांच्या तब्बेतीपासून औषधोपचार, वैद्यकीय बिलावरून डाॅक्टरांबरोबर हुज्जत तर रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम अगदी पदरमोड करून केले. म्हणूनच त्यांच्या या समाजसेवेची दखल विविध घटकांनी घेतली बरोबरच सरपंच परिषदेनेही घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. चिंचोली गावचा यथोचित सन्मान असून अशा नेतृत्वाचे प्रमोशन होण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी दीपक पाटील, महेश पाटील, जालिंदर काळे, संजय कोळसे यांची समयोचित भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना सरपंच हारदे यांनी माझ्यापरीने केलेल्या या छोट्या कृतीला आपण सर्वांनी एवढे मोठे रूप दिल्याचे सांगताना भावुक झाले व यापुढे काम करण्यासाठी आणखी बळ मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमास गंगापुरचे सरपंच सतीश खांडके, चिंचोलीचे उपसरपंच विलास लाटे, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते किरण कडू, दिग्विजय शिरसाठ, राजेंद्र लोंढे, दिलीप दाढकर, रायभान नलगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब लाटे, उपाध्यक्ष चांगदेव राऊत, सर्जेराव लाटे, रिपाईचे संजय भोसले, संजय गागरे, संदिप काळे, दिलीप शिंदे, अमोल सोनवणे, किशोर गायकवाड, सुनील लाटे, सुनिल भोसले, प्रसाद वाघमारे, आरोग्य केंद्राचे अनाप, संदिप लोखंडे, सुनीता काळे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक जालिंदर काळे, सुञसंचालन संजय लाटे यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर पठारे यांनी केले.
मुळा प्रवरेचे संचालक व विखे पाटील गटाचे खंदे समर्थक कोल्हार खुर्द येथील दिपक पाटील यांनी चिंचोली येथे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत गणेश हारदे सारख्या तरुणाला उमेदवारी मिळत असल्यास कोल्हारला उमेदवारीचा आग्रह सोडणार असल्याचे भरसभेत जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
0 टिप्पण्या