राहुरी/ बाळकृष्ण भोसले - अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षांतर्गत नवीन तालुका काँग्रेस अध्यक्षांच्या निवडी सुरू आहेत. त्यानुषंगाने पहिली निवड राहुरी तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची झाली. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब आढाव पाटील यांची फेर निवड करून त्यांचा पुष्पगुच्छ देवुन संत्कार केला.
यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहु कानडे, अहमदनगर जिल्हा बॅकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा काँग्रेस समन्वयक ज्ञानदेव वाफारे, प्रदेश काँग्रेसचे सचिव हेमत ओगले, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सचिनजी गुजर, तालुकास्तरावरील निवडणुक अधिकारी योगेश मसलगे पाटील, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार, तसेच निवडणूक अधिकारी प्रविण पुंडलिक केदार, अंकुश कानडे, अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे पाटील, बाळासाहेब चव्हाण, अमृत धुमाळ पाटील, संजुभाऊ पोटे, नितीन पाटील, संजय भोसले, बबनराव ढेकणे, शशीकांत गाडे, अनुसूचित जाती विभागचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, बन्टि यादव, रखमाजी क्षिरसागर, सुरेश पाटील शिरसाठ, अजित तारडे, संजय विधाटे, सौ. कमलताई साळवे, बाळासाहेब सगळगिळे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या