जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांचे सातत्य हेच यशाचे गमक - अमेरिका खंड व्यवस्थापक रोहीत काळे

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर विद्यालयात अमेरिकेत स्थायिक असणारे कारेगावचे सुपुत्र रोहीत बाबुराव काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रयत्न, जिद्द आणि चिकाटीने अभ्यासात सातत्य ठेवल्यास उत्तुंग यश शिखर गाठता येते.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या आयुष्याचं सोनं करावं. आपले पालक, आपलं गाव, आपली शाळा, आपला देश यांना अभिमान वाटावा असे प्रयत्न आपण करावेत. यासाठी आपण अभ्यासाचे कष्ट करा, असेही ते म्हणाले. आपले यशस्वी जीवन कार्याबद्दल मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

रोहीत काळे हे मिशलीन टायर्स या जगप्रसिद्ध फ्रेंच कंपनी मध्ये अमेरिका खंडाचे खरेदी व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. चाळीस देशातील केलेला प्रवास तेथील आठवणी आणि विविध अनुभव सांगितले. ग्लोबल नगरी ही non profit संस्था स्थापन करून त्याचे सीनियर बोर्ड प्रथम सेक्रेटरी म्हणून सध्या काम पहात आहेत. जास्तीत जास्त शिक्षण क्षेत्रावर जास्त भर देत आहेत.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एम व्ही खाजेकर, एस.जे.काळे, के.एस.कवडे, सौ एस जे राऊत, एस सी फासाटे, एस एन साळवे, एस व्ही कवडे, श्रीमती एच ए बोरूडे, श्रीमती यादव, दीपक आदिक, एस बी पानसरे आदींची उपस्थिती होती. विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्रीमती एस सी फासाटे मॅडम यांनी केले. एस जे काळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या