राहुरी / बाळकृष्ण भोसले - “पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घेण्यात येणार असुन त्यापूर्वी सर्व तालुक्यामध्ये तालुकास्तरीय विविध साहित्यिक उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत,” अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे अध्यक्ष श्री.राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात कवी चंद्रकांत पालवे,मार्गदर्शक ज्ञानदेव पांडूळे,माजी अध्यक्ष प्रा.डॉ.शंकर चव्हाण,धुळे जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर सूर्यवंशी,बीड जिल्हा प्रतिनिधी सिराज शेख,संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली,त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले,विविध पुरस्कार प्राप्त व नैपुण्यधारक साहित्यिकांचे अभिनंदन करण्यात आले,श्रीरामपूर तालुकास्तरीय शाखा कार्यकारी मंडळास मान्यता देण्यात आली.एक एप्रिल २०२२ पासूनच्या जमा खर्चास मान्यता देण्यात आली.नवीन सभासदांना मान्यता देण्यात आली.पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये करण्याचे ठरले.राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार निवड परीक्षण समितीची निवड करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, खजिनदार भगवान राऊत, उपाध्यक्षा प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे, कार्यवाह सुभाष सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड, शेवगाव तालुकाध्यक्ष हरिभाऊ नजन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष लेविन भोसले, राहुरी तालुका कार्याध्यक्ष जयश्री झरेकर, कोपरगाव चे प्रमोद येवले, पारनेर च्या स्वाती ठुबे, सहसचिव नेवासे चे सुनीलकुमार धस, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत वाघ, प्राचार्य अशोक ढगे, राजेंद्र पवार, चिलेखनवाडी चे सरपंच लेखक भाऊसाहेब सावंत, राज्य संघटक शर्मिला गोसावी, शहाराम आगळे, आर.आर. माने, राजेंद्र पवार, किशोर डोंगरे, डॉ.कैलास दौंड, कृष्णकांत लोणे, बबनराव गिरी यांच्या सह अनेक सभासद, हितचिंतक उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन भगवान राऊत यांनी केले तर शेवटी सुभाष सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी मनोगत व्यक्त केले.
0 टिप्पण्या