शाळा क्र ७ ची दिंडी ठरली लोकांचे आकर्षण

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) - येथील नगरपालिका शाळा क्र. ७ मोरगे वस्ती शाळेने आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांची दिंडी काढून विद्यार्थ्यांना एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली.

यावेळी मुलांनी विठ्ठल रुक्मिणीची वेषभूषा परिधान करून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. दुसरे आकर्षण होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांची वेषभूषा परिधान केलेल्या बालगोपाळांचे आकर्षण या सोबत होते ते वारकरी, टाळकरी आणि विद्यार्थी,  शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी या भक्तिमय वातावरणामुळे मोरगे वस्ती परिसरातील लोक भारावून गेले. लोकांनी उस्फूर्त स्वागत केले.

या दिंडी सोहळ्यासाठी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे, मुख्यलेखापाल रूपेश गुजर, वरिष्ठ लिपिक किशोर त्रिभुवन, तंत्रस्नेही शिक्षक सचिन शिंदे, माजी मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई कुर्हे, सौ.प्रतिभाताई जयकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. रजनीताई कर्डीले, सौ. कल्पना जगताप, श्रीमती वर्षा वाकचौरे यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या