गेल्या अडीच वर्षांपासून कै.अण्णासाहेब पाटील महामंडळाला अध्यक्ष मिळालेला नाही. अध्यक्ष नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी लाभार्थ्यांनी कुणाकडे मांडाव्यात असा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून महामंडळाचे काम संथ गतीने चालले आहे. बँका मराठा समाजातील युवकांना व्यवसायासाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. मा.नरेंद्र पाटील यांनी या पूर्वी अध्यक्ष पदावर असतांना महाराष्ट्रातील 26 जिल्हे, 28 तालुक्यात स्वतः दौरे करून कै.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. महामंडळ व बँक यांच्यामधील दुवा बनून लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासमोर तात्काळ दूर करण्याचे काम नरेंद्र पाटील यांनी केले आहे. संपूर्ण राज्याचा नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये एक आदर्श महामंडळाचा कारभार आणि पारदर्शी लोकाभिमुख अध्यक्ष कसा असावा याचे उदाहरण महामंडळाच्या कामामधून दाखवून दिले आहे.
मराठा समाजातील तरुणांच्या मनातील कै.अण्णासाहेब पाटील महामंडळाचा अध्यक्ष हे आजही मा.नरेंद्र अण्णासाहेब पाटील आहेत. मराठा समाजासाठी कर्तव्यदक्ष, बेधडक, समाजाप्रती प्रामाणिक काम करण्याची इच्छा असणारे व्यक्तिमत्व मा.नरेंद्र पाटील आहेत. मराठा समाजातील युवकांना उद्योजक बनविण्यासाठी मा.नरेंद्र पाटील यांना पुन्हा कै.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्ष पदी निवड करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे पत्रा द्वारे देवेंद्र लांबे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या