संगमनेर सहकारी दूध संघाच्या कार्यकारी संचालकपदी डॉ सुजित खिलारी यांच्या निवडीबद्दल सत्कार

अहमदनगर/ जावेद शेख : संगमनेर सहकारी दूध संघाच्या कार्यकारी संचालक पदी डॉ सुजित खिलारी यांची निवड झाल्याबद्दल योगी केशव बाबा चौधरी यांच्या हस्ते व दुध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.

संगमनेर दूध संघाच्या बैठक सभागृहात हा सत्कार करण्यात आला. यावेळी दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, भाजपा सोशल मिडिया सेल उत्तर नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, दूध संघाचे संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

केशव बाबा यांनी बोलताना सांगितले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली रणजित देशमुख यांनी दूध संघाचे कामकाज अतिशय उत्तम केले असून डॉ खिलारी हे उत्कृष्ट प्रशासक असून दोघेही मितभाषी असल्याने हि राजहंसाची जोडी अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करून दूध संघाचा लौकिक वाढवतील अशी आशा व्यक्त केली.

यावेळी दूध संघाच्या वतीने योगी केशव बाबा यांचा सत्कार चेअरमन रणजितसिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या