देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दोन ठिकाणी तर श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे.
श्रीरामपूर येथिल श्रीराम नवमी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १३ एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपूर शहरातील गोंधवणी व राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दोन ठिकाणी अचानक छापा टाकून हातभट्टी बनविण्याचे अड्डे उध्वस्त करून हातभट्टी तयार करण्याचे ६ हजार २९० लिटर कच्चे रसायन व तयार हातभट्टी गावठी दारू २३३ लिटर असा एकूण १,८६,३००/- चा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून अज्ञात इसमांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई), (फ) अन्वये कारवाई करून एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. नव्याने सुरु झालेले दारु अड्ड्याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.
हि कारवाई विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे प्रसाद सुर्वे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर गणेश पाटील, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोळपेवाडी आसवानीचे नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गोपाल चांदेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक पी. बी. अहिरराव, ए. जे. यादव, एन. सी. परते, के. यु. छत्रे, डी. वाय. गोलेकर, एम. डी. कोंडे, व्ही. एम. बारवकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक के. के. शेख, एस. एस. गारळे, टी. बी. करंजुले, आर. बी. कदम, एन. ए. ठुबे, पी. डी. साळवे, बी. के. नागरे, सी. बी. पाटोळे, महिला अधिकारी एस. आर. फटांगरे, व्ही. एस. जाधव, वाहन चालक व्ही. आर. कर्पे, एस. एम. कासुळे आदी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या