चांदशहावली बाबा यात्रात्सवाला सुरवात

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या चांदशहावली बाबा दर्गा आहे. दरसाल दरवर्षी नेमानुसार कुठल्याही प्रकारचे वादविवाद, जातीभेद न ठेवता संपूर्ण पंचक्रोशीतील युवक, नागरिक, महिला, मुलं ही आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामदेवता चांदशहावली बाबा यात्रात्सवाला सुरवात करतात आणि शेवट पर्यंत यात्रा पार पाडतात.

चिखलठाण येथे ४५ वर्षापासून चांदशहावली बाबा ची दर्गा आहे. सर्वधर्मसमभाव बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात. १२ एप्रिल २०२२ ला चिराखाचा कार्यक्रम पार करत ढोल ताशांच्या गजरात संदल नेण्याकरिता मोगरा, गुलाबाच्या फुलांची चादर तयार करून तसेच गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून चांदशहावली बाबा दर्गा येथील जागृत देवस्थानात नेण्यात आले.

कोरोना मुळे गेली दोन वर्षानंतर यात्रात्सवाला सुरवात झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, तरूण युवक कार्यकर्ते यांच्या आनंदाचा क्षण सोनेरी झाल्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते. आनंद गगनाला भिडू लागल्याने संदलाचा कार्यक्रम हा संपूर्ण पंचक्रोशीतील भागात झगमगाट दिपानी प्रकाशमय झाला होता. गावातील सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या मनोरंजनासाठी सविताराणी पुणेकर यांचा तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या यात्रात्सवाला शोभा वाढवावी म्हणून जंगी हगामा कुस्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. ५० रू पासून ते ५० हजारापर्यंत बक्षिसाचे नियोजन केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या