श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : खा. सुप्रियाताई सुळे ह्या दि.१९ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर भेटीला येणार असल्याचे समजल्यावर सकाळी राष्ट्रीय अधिवेशन संपल्यावर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शिर्डीहून सरळ नगर येथील रयत कार्यालयात जाऊन खा. सुळे यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. खा. सुळे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांसोबत १५ मिनिटे पेन्शन प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात पश्चिम क्षेत्र संघटक सचिव सुभाष पोखरकर, संपतराव समिंदर, जिल्हाध्यक्ष भगवंत अप्पा वाळके, नारायण ईराबत्तीन सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या