दिपकराजे शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी सैनिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

अहमदनगर : सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज व शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी सैनिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, आदरणीय कर्नल संभाजी पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनीलदादा टिंगरे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश संघटक सचिव मंगेश मोरे व प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल ची स्थपना करण्यात आली. यावेळी दिपक गणपतराव शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (माजी सैनिक सेल) प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर बाबासाहेब जाधव यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी सैनिक उपस्थित होते. पांडुरंग शिरसाट सरपंच, कॅप्टन शेषराव काळवाघे, अजित निंबाळकर, कॅप्टन बाबू गोविंद पोळके, सुधीर शिंदे, पोपट शिरसाट मूढ़े तात्याराव देवीदास, चंद्रकांत देवड़े, प्रवीण येवले, सुरेश उमाप, राजेन्द्र धुमाल, शहाजी धुमाल, विलास शिवले, जयदीप घोलप आदी माजी सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या