राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी खुर्द येथील बुवासाहेब महाराज देवस्थान यात्रा उत्सव दि.१५ एप्रिल रोजी शुक्रवारी संपन्न होत आहे. यात्रा उत्सवामध्ये सर्वानी सहभाग नोंदवावा असे आवाहान यात्रा कमिटीचे अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते गेणूभाऊ तोडमल यांनी केले आहे.
यात्रा उत्सावानिमित्त बुवासाहेब महाराजांच्या मुर्तीला पुणतांबा येथून पायी कावड यात्रा आणलेल्या पवित्र जलाने जलाभिषेक करण्यात येणार आहे. तसेच दि.१६ एप्रिल रोजी शनिवार रोजी जिल्ह्यातील नामवंत मल्लांचा जंगी हंगामा होणार आहे. करोनामुळे दोन वर्षे यात्रोत्सव स्थगित होता. मात्र यंदा भाविकांचा मोठा उत्साह दिसुन येत आहे.
यात्रोत्सव साजरा करण्यासाठी उपाध्यक्ष निसारभाई शेख, तनपुरे कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस, लक्ष्मण चोपडे, पोपट चोपडे, असफ पठाण, राम तोडमल, रफिक शेख, दिलीप चौबारे, भाऊ जाधव, भाऊ शेडगे, सोमनाथ गुंड, दादा शेटे, दिलीप क्षिरसागर, मछु पाटोळे, साहेबराव मोरे, एकनाथ माळी, साहेबराव माळी, साईनाथ भिसे, युवराज तोडमल, साहेबराव धोत्रे, जयपाल गिरासे, रामदास कदम, पत्रकार अशोक मंडलिक, भिमा गुंड आदींसह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
0 टिप्पण्या