आठवडाभर चालणाऱ्या राजा बागस्वार वली यांच्या ऊरसात भरगच्च असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. ऊरसानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची ढोरकीन ग्रा.पं तर्फे विशेष काळजी घेतली जाते. सर्वधर्मीय लोक या ठिकाणी दर्शनास येतात.आपल्या मनोकामना पुर्ण व्हाव्यात म्हणून अनेकजण नवस करतात तर आपण केलेला नवस फलद्रुप झाला म्हणून तो फेडण्यासाठी अनेकजण येतात.
बुधवारी कावडीने गोदावरीचे जल आणून सकाळी जलाभिषेक घालून उरुसास प्रारंभ झाला असून रात्री संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवार (दि.७) रोजी मुख्य उरुस, छबीना मिरवणूक, शुक्रवार भव्य कुस्ती सामना यामध्ये कुस्ती ईनाम ११ रुपयापासुन ते १५००० रुपयांपर्यंत देण्यात येईल. यामध्ये पंचाचा निर्णय अंतीम राहील. ढोरकीन येथील कुत्यांच्या दंगलीत महाराष्ट्रातील औंरगाबाद, बीड, सोलापुर, जालना, अहमदनगर, कोल्हापुर येथील मल्ल दरवर्षी हजेरी लावतात व शनिवार दि ९ रोजी मशहुर सूफी गायक समीर ताज व रेडिओ व टिव्ही स्टार गायक परवीन कछवाली यांच्यात कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे.
उरूस मैदान व परिसरात स्वच्छता करण्यात आली असुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राहाट पाळणे, खेळणी, खाद्यपदार्थ, कपडे, भांडी, आदी संसारउपोयोगी वस्तूसह आदींची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली असून यातून लाखोंची उलाढाल होणार आहे. राजा बागसवार बाबाच्या दर्ग्यावर तालुक्यासह परिसरातील व जिल्ह्यातील हजारो भाविक बाबांच्या दर्ग्यासमोर नतमस्तक होतात. आपला नवस गुळभात, पेढे वाटून मोठ्या श्रध्देने भक्तीमय वातावरणात वाजतगाजत मिरवणूक काढून फेडतात यात हिंदू मुस्लीम या दोन्ही समाजाचा समावेश असतो.
दरम्यान उरूस सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, ढोरकीन बिटचे जमादार राजेश चव्हाण, कर्तारसिंग सिंगल, उगले आदी पोलीस कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.
८० स्वयंसेवकांना विनोद बोंबले यांच्या हस्ते टि शर्टचे वितरण
यात्रेमध्ये भाविकांना दर्शनासाठी गैरसोय होऊ नये. वाहनाना अडथळा, वाहतूक कोंडी होऊ नये. यात्रा कालावधी मध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून काम करने. यासारख्या अनेक कामासाठी यात्रा कमिटीकडून ढोरकीन येथील ७५ तरूण वर्गाची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वयंसेवक शिस्तबद्ध व एकाच गणवेशात दिसावे यासाठी ॲड. विजय मुळे यांच्या संकल्पनेतून स्वयंसेवकासाठी गणवेश ठरवण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले यांनी या स्वयंसेवकासाठी ८० टी शर्टचे वाटप केले. ज्यामुळे स्वयंसेवक गर्दीत उमटून दिसेल. व यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना मदत करेल.

0 टिप्पण्या