वंचित बहुजन आघाडीच्या राहुरी तालुका महासचिवपदी कोकाटे

अहमदनगर/ जावेद शेख : वंचित बहुजन आघाडीच्या राहुरी तालुका महासचिवपदी नुकतीच संदीप कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे.

श्रमिक मुक्ती दलाचे धडाडिचे नेतृत्व, विद्रोही विद्यार्थी संघटना, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व सुगी फैडेंशनचे संस्थापक अध्यक्ष अशा अनेक आघाड्यांवर नेतृत्वाच्या माध्यमातून कृतिशील काम करत असलेले अहमदनगर जिल्ह्यात असंघटित कामगार, तसेच कोरोना आपत्ती काळात गरजू असंघटित कामगार कुटूबांना किराणा वाटप केले. गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. आरोग्य शिबीर घेतले. गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कृतिशील प्रयत्न कोरोना आपत्तीच्या काळात केला व आजही काम सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांचें वसतिगृह व शैक्षणिक हक्कासाठी संघर्ष उभा करणारे, राहुरी तालुक्यातील डोंगर भागातील तळागाळातील जनतेसाठी कृतीतून संघटनात्मक मोर्चे आंदोलन प्रशासनाला धारेवर धरून संघर्षात्मक न्यायाची लढाई लढत लेखी निवेदनाचा पाठपुरावा करत समस्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करत आहेत. समविचारी संघटनाना नेहमी सोबत घेणे व सहकार्य करत कृती करत राहणे अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. छत्रपती शिवाजीराजे यांच्यासारखे राज्य निर्माण व्हावे म्हणून फुले, शाहू, आंबेडकर पुरोगामी विचारसरणी घेऊन समाजकारण, राजकारण महाराष्ट्रात उभा करण्याचं कृतिशील काम नेहमी करत आलेले आहेत, अशा विद्यार्थी जीवनापासून ते वस्तीगृहात शिकत असल्यापासून अहमदनगर जिल्ह्यात तळागाळातील समूहाला लोकशाही समजली पाहिजे सत्ताधारी बनलं पाहिजे यासाठी कृतीतून राहुरी तालुक्यातील जनतेला बुळे पठार स्वतंत्र महसूल गावचा लढा असेल, चिखलठाण, कोळेवाडी, दरडगाव थडी, ग्रामपंचायत निवडणूक लढवून सत्ताधीश देखील करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे खूप कमी कालावधीमध्ये स्थानिक गावपातळीचा राजकीय अनुभव असलेले, वैचारिक व संघर्षात्मक व्यक्तिमत्व या सर्व कामाचा आढावा घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे व जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी संदीप कोकाटे यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहिर प्रवेश दिनांक १ मार्च २०२२ रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव यांनी पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर करून तालुका महासचिव या पदावर निवड केल्याचे जाहीर केलेे.

यावेळी वंचित आघाडीचे मार्गदर्शक आयु. शिरीष गायकवाड, उत्तर जिल्हा महिला अध्यक्ष वर्षाताई बाचकर, जिल्हा संघटक निलेश जगधने, राहुरी शहर अध्यक्ष पिंटूनाना साळवे, जिल्हा सहसचिव बाबा साठे, संविधान बचाव संघर्ष समितीचे कांतीलाल जगधने तसेच संगमित्रा वस्तीगृहाचे प्रमुख आयु मधुकर विधाटे व विधाटे मॅडम हे यावेळी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी महासचिवपदी निवड झाल्याबद्दल संदीपजी कोकाटे यांचा पुष्पगुच्छ देऊन शाल व फेटा घालून वर्तमान काळात राजकीय क्षेत्रात महाराष्ट्रातील वंचित समूहांना कृतिशील न्याय देण्यासाठी व संघर्षासाठी सदिच्छा दिल्या व आपण सर्वजण राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत राहूया असे यावेळी वंचित बहुजन आघाडीतील सर्व उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या