गुंडेगावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अहमदनगर/ जावेद शेख : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आपली ओळख सिध्द केली आहे. महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळाले. यावेळी सन १९९५ ते २००० या काळात गुंडेगावच्या पहिल्या महिला संरपच अनुसयाताई उत्तम भापकर यांनी गावची धुरा हातात घेतली व खंबीरपणे उभे राहून गावच्या विकासासाठी मोलाची भुमिका पार पाडली. माजी संरपच अनुसयाताई भापकर यांनी वाडी तेथे अंगणवाडी चालू केली व गावाला शिक्षणाचा मुलमंत्र दिला व गरिबांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय महिला असून सुध्दा खंबीरपणे घेतले. अशा या गुंडेगावच्या पहिल्या कर्तृत्वान महिला ठरल्या.

डॉ.नयना गजानन भापकर यांनी सुध्दा आपल्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून गुंडेगाव येथील शालेय मुली, गरीब मातेची निशुल्क प्रस्तुती, अनेकांना आर्थिक मदतीबरोबर गावची धुरा हातात घेतली व गुंडेगावच्या संरपच पदाची शपथ घेतली व आदर्श गुंडेगाव बनविण्यासाठी चंग बांधला व डॉ. नयना भापकर यांनी आदर्श संत तुकाराम वनग्राम पुरस्कार गावाला मिळुन दिला व अनेक योजना महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या. या सुध्दा गुंडेगावच्या कर्तृत्वान महिला ठरल्या.

ज्योतीताई संतोष भापकर यांनी तर तहसीलदार पदाची नोकरी सोडून गावातील शेतकरी महिलांसाठी काम करण्याचं ठरवलं, संपुर्ण शेतकरी गटाच्या माध्यमातून अनेक शेतकरी महिला जोडून एक महिलांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ज्योतीताईनी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे गुंडेगाव मधील अनेक महिला अधिक सक्षम बनल्या आहेत. यामुळे खर्या अर्थाने ज्योतीताई संतोष भापकर या सुध्दा कर्तृत्वान महिला ठरल्या आहेत.

याचप्रमाणे गुंडेगावाचे प्रथम नागरिक बहुमान विद्यमान महिला संरपच मंगलताई सकट, ग्रामपंचायत सदस्य साधनाताई चौधरी, हराळ, आश्विनीताई चौधरी या सारख्या महिला गावचे प्रतिनिधीतत्व करत आसून सौ. सुवर्णाताई संतोष धावडे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांचे आर्थिक स्थर उंचावुन महिला उन्नतीसाठी काम करत असून पुढील महिला सक्षम होणार आहे. खरच सुवर्णाताई यांचे काम उल्लेखनीय आहेे. याच बरोबर शिक्षणामुळे अनेक संधी उपलब्ध आसताना सुध्दा प्रिती भापकर यांनी आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी काही तरी करता येईल का या भावनेतून कोरोनाच्या महामारीत विनामोबदला काम करुन घराघरात आरोग्याचा जागर केला, असे अनेक आपल्या गावातील महिला कर्तृत्वान आहात आपण नक्कीच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान या महिलांचा केला पाहिजे.

महिला दिन २०२२ राजकारण, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आदी क्षेत्रांतील महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उभारत आहेत. संसार सांभाळून, नोकरी-व्यवसायात उंच भरारी घेणाऱ्या अनेकजणी तारेवरची कसरत करत यशस्वी होत आहेत. अनेक अडीअडचणींवर मात करीत ‘ति’चा अखंडित प्रवास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या