पाचोड/ विजय चिडे : पाचोड (ता.पैठण) येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचालित शिवछत्रपती कला महाविद्यालयच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. चंद्रसेन पांडुरंग कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी डाॅ. कोठावळे हे मस्योदरी महाविद्यालय अंबड तसेच माॅडेल महाविदयालय, घनसावंगी येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या निवडीबद्दल रोहयो मंत्री संदीपान भुमरे, संस्था अध्यक्ष राजू भुमरे, माजी बांधकाम सभापती तथा जि.प.सदस्य विलास भुमरे यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या