देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासु समर्थकांसह आज दुपारी १२ वाजता भाजपला रामराम करून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी आ.शिवाजीराव कर्डीले येत्या आठ दहा दिवसात राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे विश्वासनिय सुञाकडून समजते आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे हे राष्ट्रवादीत जाणार अशी वारंवार चर्चा होत असताना आज अचानक अमोल भनगडे यांच्यासह विश्वासु समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत. आज दुपारी १२ वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समवेत किरण कोळसे, पोपट कोबरणे, सुयोग नालकर, अनिल घाडगे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

अमोल भनगडे हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार असून जिल्हा परीषदेत यापुर्वी राष्ट्रावादीची सत्ता असल्याने व राजकीय गणित बांधुन भनगडेसह विश्वासु समर्थकांनी राष्ट्रावादीत प्रवेश करुन आगामी जिल्हा परीषदसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे आश्वासन मिळाले आहे. शिवाजीराव कर्डीले यांनीच भनगडे सह समर्थकांना राष्ट्रावादीत पाठवले आहे. त्यांच्या पाठोपाठ कर्डीले राष्ट्रावादी प्रवेश निश्चित मानला जात आहे.

दरम्यान माजी आ.कर्डीले राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा असून ते येत्या ८ किंवा १० मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या बरोबर  राहुरीतील काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. राहुरीतील राजकारणाची दिशा बदलून राहुरी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परीषदेचे निवडणूकीत राष्ट्रावादीच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार व भाजपाचा परखड नेता निर्माण करावा लागणार आहे.