पैठण : जागतिक महिला दिना निमित्त जिव्हेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व पैठण तालुका डॉक्टर असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळीवाडा येथे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक शितल सोनवणे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा अॅड. शाहिन शेख उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जवळपास 175 महिलांची शुगर, बी.पी. तपासून त्यांना मोफत औषधाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान डॉ. सुनंदा खणसे, डॉ.मनीषा सासणे, डॉ.लोहिया यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. शितल सोनवणे यांनी महिलांना बचत गट संबधी माहिती देवुन महिलांनी आर्थिक प्रगती कशी करावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. अॅड शाहिन शेख यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच कार्यकमात उपस्थित पीएसआय श्रीमती सांगळे, श्रीमती सुडके,अॅड. कमलताई चव्हाण यांनी आपल्या कामाबाबत तसेच घरगुती वाद कसे मिटतील ते पोलीस स्टेशन पर्यंत येणार नाही. याबाद्द्दल मोलाचे मार्गदर्शन केले. अश्विनी लखमले यांनी कार्यक्रमात महिलांना तहसील कार्यालयातील कामकाजाबाबत मार्गदर्शन करून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिता घोडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपाली सोनारे, सुवर्णा घोडके, नयना लखमले, कल्पना धर्माधिकारी, डॉ.अनिता घोडके, वंदना धेंड, अंजली घोडके, योगिता भुजबळ, ममता आहुजा, लिना लोहिया, अर्चना निकम, प्रियंका शेकटकर, संध्या घोडके, रोहणी आहिरे, रुपाली तलबे, नंदा खुस्तुले, प्रेमिला राऊत, सारिका वाघे, नरवडे, श्रावणी वीर, आरती वीर, अर्चना गवळी, रंजना गायकवाड, डॉ.शैलेश घोडके, डॉ.निकम,ज्ञचेअरमन अनिल घोडके, नगरसेवक ज्ञानेश घोडके, राजेश घोडके, व्यवस्थापक अतुल देशपांडे, अमरीश घोडके, श्रीराम बेळगे, अतुल मारवाडी, संदीप गायकवाड, मधुकर अंधारे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. महिला दिनाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन अनिल घोड़के यांनी उपस्थित मान्यवरांचे व महिलांचे संस्थेतर्फे आभार मानले.
0 टिप्पण्या