| महाशिवरात्री निमित्त मुलानी वाडगाव (ता.पैठण) येथील ऐतिहासिक गंगेश्वर मंदिरात उसळलेली भाविकांची गर्दी. |
पैठण : पैठण तालुक्यातील मुलानीवाडगाव (जुने) येथील ऐतिहासिक महादेव गंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने सकाळ पासुनच पंचक्रोशीतील मुलानीवाडगाव, लामगव्हान, हमावसगव्हान, ढाकेफळ, तारुपिंपळवाडी, शेवता, ७४ जळगाव आदी गावामधुन दर्शनासाठी शिवभक्तांची रीघ लागली होती.
गोदावरी नदीकाठी स्वयंभू प्रगट शिवलिंगाच्या ऐतिहासिक पुराणत काळातील या महादेव मंदीराची ओळख असुन मंदीराप्रती परीसरात मोठे श्रद्धास्थान आहे. शिवरात्रीच्या शुभ मुहर्तावर भजन, किर्तन करुन बाहेरगावाहून आलेल्या भक्तांसाठी मोफत फराळ व फळे वाटप करुन मोठ्या आनंद उत्साहात शिवरात्रीचा पवित्र पर्व साजरा करण्यात आला.
शिवभक्तांनी महाशिवरात्रीचा उपवासव्रत धारण करुन हर..हर..महादेव..बम बम भोलेनाथ या नामाचा जय घोष करत जवळच असलेल्या गंगेश्वर येथील शिवलिंगाची बेल, फुल वाहून श्रद्धापुर्वक भक्ती अराधना केली.
0 टिप्पण्या