श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा यांचे गुरु श्री विश्वेश्वर नाथ बाबा यांचा ३१ वा श्री नाथबाबा पुण्यतिथी सोहळा दि १९ मार्चपासून २१ मार्च पर्यंत श्री विश्वेश्वर नाथबाबा संस्थान नेवासा बु. येथे श्री गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता गाडगेबाबा भजनी मंडळाच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
दि १९ मार्च रोजी श्री राम महाराज यांचे रात्री ७ ते ९ वा.कीर्तन, दि २० श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांचे कीर्तन, व रात्री कबीरपंथी एकतारी भजन स्पर्धा, संध्याकाळी ५ वाजता श्रीनाथबाबा पादुका मिरवणूक, दि २१ रोजी शिवजयंती प्रतिमा पूजन व श्री ह.भ.प. भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होणार आहे, अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या