वांबोरी येथील रविंद्र तुपेंची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत निवड

राहुरी / बाळकृष्ण भोसले - वांबोरी येथील रविंद्र तुपे यांची दक्षिण आफ्रिकेतील (कांगो) येथील मॉडर्न कंट्रक्शन कंपनीमध्ये निवड झाली आहे.

वांबोरी येथील सर्वसामान्य कुटुंबातील श्री बाबासाहेब व सौ ताराबाई तुपे यांचे चिरंजीव, श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांचे बंधू इंजिनिअर उमेश उर्फ रवींद्र बाबासाहेब तुपे यांची साऊथ आफ्रिका येथील कंट्रक्शन कंपनी मध्ये निवड झाली. एका गरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुरमुरे विक्रीचा व्यवसाय करुन हालाखीच्या परीस्थितीत तीन मुलांचे शिक्षण केले. एक मुलगा अशोक मुरमुरे विक्री चा उत्तम व्यवसाय करत आहे तर रवींद्र व रमेश हि मुले इंजिनिअर झाली. त्यातीलच रवींद्र याने हालाखीच्या परीस्थितीत जीद्द व चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर पुणे येथे उत्तम प्रकारे नोकरी करुन अल्पावधीतच दक्षिण अफ्रिका येथिल मॉडर्न कंट्रक्शन कपंनी मध्ये काम करण्याची संधी मिळाली, सर्वसामान्य कुटुंबातील मुलाच्या या यशाबद्ल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रामुख्याने राज्याचे मा. मंत्री शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर, जेष्ठ नेते सुभाष पाटील, रावसाहेब(चाचा) तनपुरे, राजेंद्रजी वाडेकर, तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील, डॉ. सुदर्शन गोरे, गणेश खैरे, माणीकराव विधाते, नगरसेवक दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, भगवानराव फुलसौंदर, धनंजय जाधव, सचिन गुलदगड, रमेश तुपे, पाराजी पुंड, राजेद्र शिंदे, विजय काळे, अशोक सुसे, दत्तात्रय डिवरे, शंकर जावळे, संदीप शिंदे, कचरू पुंड, प्रमोद ढवळे, राजेंद्र पाटील, तुळशीराम शिरसाठ, केरू घोगरे, सागर जाधव, शिवाजी शिंदे, संतोष ढोले, डॉ. गणेश पुंड, दिपक साखरे, सुनिल शिंदे, भरत सत्रे, संतोष शिंदे यांसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या