लोणी : लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय बँकेमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
सदर मुलाखती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात संपन्न झाल्या यामध्ये पूर्ण प्रवरा परिसरातून व प्रवरेमध्ये शिकलेल्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील जयंत बारी आणि वैभव चव्हाण यांची आय.सि.आय.सि.आय बँक मध्ये रिलेशनशीप ऑफिसर म्हणून निवड झाली.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये कॅम्पस मुलाखत, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, बँक व महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील विविध मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, औद्योगिक कंपनी भेटी तसेच
कार्यानुभव उपक्रम आदी उपक्रमाचा समावेश होतो.
सदर विद्यार्थ्यांची यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जि.प माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.सुजय विखे पाटील, संस्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, संचालिका श्रीमती लीलावती सरोदे, कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या