राहुरी तालूक्यातील टाकळीमियॉ येथे चाकूचा धाक दाखवून २५ हजारांना लूटले

देवळाली प्रवरा/ राजेंद्र उंडे : राहुरी तालूक्यातील टाकळीमियॉ येथे महेश घोरपडे यांना चाकू लावून २५ हजार रूपये लूटून नेल्याची घटना दिनांक २ मार्च रोजी घडलीय. या घटने बाबत राहुरी पोलिसांत रस्तालूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसभेत गोंधळ घालुन विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही तोच राञी उशिरा रस्तालुटीचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामसभेच्या राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, महेश सुरेश घोरपडे यांनी राहुरी पोलिसात फिर्याद देताना सांगितले की, मी व माझा मित्र मुकुंद बाळासाहेब निमसे हे मोटरसायकलवरुन राहुरी ते टाकळिमियाॅ रोडने घरी परत जात असतांना मारुती मंदिराच्या थोडे पुढे रोडचे साईडला राहुरी शिवार येथे लघवीसाठी थांबलो. तेथे यातील आरोपी पिंटू ऊर्फ सुरेंद्र सांगळे आणि एक अनोळखी इसम हे एका विना नंबरच्या मोटर सायकलवर आले. आरोपी पिंटू ऊर्फ सुरेंद्र सांगळे हा मोटर सायकलवरुन खाली उतरला आणि त्याने महेश घोरपडे यांच्या पोटाला चाकु लावुन म्हणाला की, तुझ्याकडे पैसे आहे मला माहीत आहे. ते तु चुपचाप काढुन आमच्या कडे दे. नाहीतर तुला चाकुने ठार मारुन टाकीन. असे म्हणुन त्याने महेश घोरपडे यांच्या पँन्टच्या खिशात हात घालुन त्यांच्या जवळील पंचवीस हजार रुपये काढुन घेतले. आणि त्यांना धक्का देवुन ते मोटरसायकल चालु करुन निघुन गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे.

महेश सुरेश घोरपडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत पिंटू ऊर्फ सुरेंद्र विजय सांगळे व एक अनोळखी इसम अशा दोघांवर रस्तालूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत. टाकळीमियाँ येथे ग्रामसभेत शिवस्मारक उभारण्यावरुन वाद उफळला गेला. या वादातुन विनयभंगा सारखे गुन्हे दाखल करण्यात आले. राञी उशिरा रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामसभेचे राजकारण गुन्हे दाखल करण्या पर्यंत गेले की काय याबाबत उलट सुलट चर्चा चालू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या