श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर येथे दहावीचा निरोप समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मा.नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, मोरगे हाँस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.विनायक मोरगे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नितीन पवार यांनी भूषवले.
गोरक्षनाथ मंदिर ट्रस्ट चे मठाधिपती सेवानाथ महाराज, गव्हनिँग कौन्सिल सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हंसराज आदिक, गव्हर्निंग सदस्य सुनील थोरात, माजी शिक्षिका साधना शेळके, नवनाथ बेरड, बाबासाहेब पवार, काशिनाथ गव्हाणे, सोपान शेरकर, आनंदी ग्रामसंघ बचत गटाच्या अध्यक्षा दुर्गाताई पटारे, व त्यांच्या बचत गटातील महिला वर्ग, मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होता. प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या शुभहस्ते विद्यालयातील नवीन आयसीटी लॅबचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंदाकिनी खाजेकर यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करून सर्वांचे स्वागत केले.
दहावीचे वर्गशिक्षक राजूसाहेब झीने यांनी सर्व अतिथींचा परिचय करून दिला व सर्वांचे स्वागत केले. प्रतिकूल परिस्थितीतच खरा विद्यार्थी घडत असतो. विद्यार्थ्यांनी जिद्द व प्रयत्न सातत्यपूर्ण ठेवल्यास यश निश्चितच मिळते. असे सांगून डॉ. मोरगे यांनी आपला जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर विषद केला. मा.नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी आयसीटी लॅबचे उद्घाटन करून विद्यालयातील प्रगतीचा आढावा घेऊन विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ह.भ. प. सेवा नाथ महाराज यांनी अध्यात्म विचारांचे वलय शैक्षणिक संस्काराला आवश्यक आहे. जीवनात नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे. असे विचार मांडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन पवार यांनी आपल्या भाषणातून शिक्षणातून संस्कार नैतिकता व नम्रता या गुणांच्या संयोगातून आपले व्यक्तिमत्व उदयास यावे. असे विद्यार्थी निर्माण होणे अपेक्षित आहे. असे विचार मांडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मोफत भोजन व्यवस्था पालक नवनाथ बेरड यांनी व मोफत मंडप, पाणी व्यवस्था बाबासाहेब पवार यांनी केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. ऋतुजा जाधव, धनश्री शेरकर, अमृता सलालकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सौ साधना शेळके यांनी आय सी टी लॅबला लोखंडी सेफ्टी दरवाजा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
इयत्ता दहावीच्या वर्गातून गणित, विज्ञान या विषयामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ५०००/- रू. रक्कम देऊन ठेवीच्या व्याजातून बक्षिसे देण्यात यावी असे जाहीर केले. विद्यालयातील शिक्षक झीने, काळे के.एस., एस.वी.कवडे, शिंदे सौ.राऊत, सौ.आसने, खुरुद यादव, गवारे आदिक, पानसरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.सी.फासाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमलता बोरुडे यांनी मानले.
0 टिप्पण्या