राहुरी शहर/ अशोक मंडलिक : आपल्या राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारवाडी सोसायटीच्या पंचवार्षिक २०२२/२०२७ निवडणुकीमध्ये जनसेवा मंडळांच्या सर्व उमेदवारांनी विरोधी मंडळांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉजीत जप्त करून मल्हारवाडी सोसायटीच्या सर्व सदस्यांनी जनसेवा मंडळांच्या सर्व उमेदवारांना उचांकी मतांनी सर्वांना निवडून दिल्याने ३० वर्षाची मल्हारवाडी सोसायटी मध्ये जनसेवा मंडळाची सत्ता आबाधित ठेवल्याबद्दल सोसायटीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे माजी खा. प्रसादराव तनपुरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी उपस्थिती मध्ये मल्हारवाडी सोसायटीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, राहुरी साखर कारखान्याचे माजी संचालक नारायणराव जाधव, काशिनाथ डोंगरे, मधुकर गागरे, राजेंद्र सरोदे, भास्कर गागरे, विलास जाधव, कैलास मुसमाडे, विलास गोसावी, मच्छिंद्र जाधव, आप्पासाहेब कोठुळे, भारत पवार, संपत जाधव, सुधिर गावडे तसेच मल्हारवाडी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भोजराज गाडे, मल्हरवाडी ग्रामपंचायत सरपंच मंगेश गाडे, उपसरपंच किशोर जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब जाधव, शिक्षण कमिटी अध्यक्ष रमेश गावडे हे देखील उपस्थित होते.
0 टिप्पण्या