पिंपळवाडी येथून विवाहीत महिला बेपत्ता


पैठण : तालुक्यातील पिंपळवाडी येथून ३२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली असून, याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शारदा रविराज नलावडे असे बेपत्ता महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, शारदा हिचा गावातीलच रविराज नलावडे यांच्याशी पंधरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिने (दि.८ मार्च) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुटुंबातील पतीसह सर्व सदस्यांना जेवण वाढले व ती म्हणाली की, शेजारच्या मामीला विचारुन येते खिचडी देवू का असे म्हणून ती निघून गेली. बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. म्हणून तिची शेजारीपाजारी तसेच गावातील नातेवाईकांकडे विचारणा केली असता ती कोठेच मिळून आली नाही.

याप्रकरणी पती रविराज नलावडे यांच्या फिर्यादीवरून पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तिचा रंग गोरा, शरीर बांधा मध्यम, चेहरा लांबट, उंची ५ फुट ५ इंच, अंगात हिरव्या रंगाची साडी असून या वर्णनाची महिला जर कुणाला आढळल्यास पैठण एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन एमआयडीसी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या