सत्यमेव जयतेकडून सौंदळ्यात महावितरणाविरुद्ध निदर्शने; वाढीव बिले दिल्यास छेडणार आंदोलन : जैद शेख

अहमदनगर/ जावेद शेख : नेवासा तालुक्यातील सौंदळा येथे आज रोजी सामाजिक कार्यकर्ते जैद शेख यांच्या नेतृत्वाखाली सत्यमेव जयते प्रतिष्ठानतर्फे सौंदळा सब स्टेशन समोर निदर्शने करून "शेतकरी विरोधी महावितरण" अश्या पाट्या हातात घेऊन निदर्शने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भेंडा पंचक्रोशीतील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीपंपासाठी दहा ते बारा तास वीज पुरवठा आवश्यक क्षमतेने सुरळीतपणे करावा, चुकीचे वाढीव बिले दुरुस्त करून द्यावी व शेतकऱ्यांची समिती गठन करून शेतकऱ्यांच्या वेळेनुसार शेत पंपासाठी विजेचा वेळ ठरवावा इत्यादी मागण्या संघटनेने आपल्या निवेदनातून मांडल्या. यावेळी सत्यमेव जयते सामाजिक संघटनेचे अद्यक्ष जैद शेख म्हणाले की महावितरण आणि त्यांचा सुरु असलेला गलथान कारभार बदलून जेवढे वाढीव बिल तुम्ही घेता त्या मोबदल्यात उत्तम सेवा ही तितकीच द्यायला हवी. शेतात पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतकऱ्यांसोबत घडलेल्या अनेक घटना समोर आलेले आहेत त्या बघता शेत पंपासाठी विजेचा वेळ ठरवणे हे खूप महत्त्वाचे आहे तसेच महावितरण कडून चुकीचे वाढीव वीज बिल वारंवार आल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी संगटनेकडून देण्यात आला.

यावेळी उमाप शंकर, विशाल जाधव, शेख अफरोज, विशाल बोरुडे, सय्यद मुसा, शेख सोहेल, लखन भारस्कर, मायकल भारस्कर, अलीम शेख, विशाल जगधने, संदेश वाल्हेकर, निपून काळे, किरण निकम, अमन इनामदार, प्रमोद निकम, गणेश धेडगे, सलमान शेख, गोविंद पाडळे, मेहेत्रे सागर व इतर ग्रामस्थांसह सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या