शिर्डी येथे इपीएस 95 पेन्शनर्स आढावा बैठक संपन्न

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा विभागातील जिल्ह्यातील पदाधिकारी यांची आढावा बैठक दि.२० मार्च २०२२ रोजी शिर्डी जि.अहमदनगर येथे संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार डाॅ.पी.एन.पाटील यांचे अध्यक्षतेखाली व पश्चिम भारत संघटक सचिव सुभाषराव पोखरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

बैठकीत जिल्हावार चालू असलेले कामकाज, सभासद नोंदणी व अडीअडचणी यावर चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेस आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी निधी उभारणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी.एस.किल्लेदार, धुळे जिल्हाध्यक्ष देविसिंग जाधव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोरख अप्पा माळी, ठाणे जिल्हाध्यक्ष मोहनसिंग राजपूत, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष शशिकांत वाडगावकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, नाशिक जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी व बारामती तालुकाध्यक्ष प्रतापराव सातपुते, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर लोकरे, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष शेख नबी, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रखमाजी मेहेत्रे, परभणी प्रतिनिधी पांडुरंग मोरे, औरंगाबाद सचिव बांगर यांनी चर्चेत सहभागी होऊन जिल्हावार माहिती दिली.
बैठकीत मराठवाडा अध्यक्ष दादाराव देशमुख, महाराष्ट्र अध्यक्ष स.ना.आंबेकर, कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर, श्रीगोंदा अध्यक्ष भगवंतराव वाळके, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण होन यांनीही मार्गदर्शन केले. सुभाष पोखरकर यांनी जिल्हावार कामात सुसूत्रता आणण्याचे व संघटनेस आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सविस्तर माहिती दिली. अध्यक्ष पी.एन.पाटील यांनी संघटना वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची उदाहरणे देऊन संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शिर्डी शहर अध्यक्ष दशरथ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सभेचे आयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या