श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : इपीएस ९५ पेन्शन धारकांच्या पेन्शनवाढी संदर्भात मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी चर्चा करून पेन्शनधारकांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास लोणार येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिले.
सध्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने देशभर पेंशनर बचाव महाअभियान सुरु आहे. त्या संदर्भात राज्यपाल ना.कोशियारी यांचेशी सविस्तर चर्चा कमांडर अशोकराव राउत यांनी करून सेवानिवृत्तांच्या व्यथा मांडल्या. केंद्र सरकारने देशातील ६७ लाख पेन्शन धारकांचा पेन्शन वाढीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. तसेच बुलढाणा येथे चार वर्षापासून सुरु असलेले साखळी उपोषण सन्मानपूर्वक समाप्त करावे आदी मागण्याचे निवेदन राज्यपाल यांना देण्यात आले.
त्यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष महिला फ्रंट श्रीमती शोभा आरस, पश्चिम भारत संघटक महिला फ्रंट सचिव सरिता वानखेडे, सहकोषाध्यक्ष बी एस नारखेडे, डी आर सालोक, पी वी आधापुरे, जे जी मछले आदी उपस्थित होते.
1 टिप्पण्या
सदरचे आंदोलन व्यापक असुन सदर सेवकांची मागणी रास्त आहे. कारण यांना मिळणारी पेंशन तुटपुंजी आहे. (रु.500 ते 2500 )या पेंशन धारकांची संक्या 71 लाख आहे. ही पेंशन रक्कम त्यांचे पेंशन कॉन्ट्रब्युशन मधुन दिली जाऊ शकते. परंतु EPC 95 पेंशन ऑफिस नाहकच आडवा आडवी करत आहे. कोर्टाचा निकालही पेंशन धारकांच्या बाजुने आहे. याबाबत मा. P. M.. साहेबांनी उपासमार करत असलेल्या पेंशन धारकांचा प्रश्न मार्गी लावावा. ही विंनती.
उत्तर द्याहटवाव्यथा , एक पेंशन धारक .