टाटा सुमो दुचाकीच्या समोरांसमोर धडकेत दुचाकीस्वार ठार


◾जायकवाडी फाट्यावरील घटना

पैठण : पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील जायकवाडी (राहुलनगर) फाट्यावर टाटा सुमो व दुचाकीची समोरांसमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.२) फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. प्रकाश कल्याण हुलसिंगे (वय ४२ रा.पिंपळवाडी ता.पैठण ) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

   अधिक माहिती अशी की, पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील जायकवाडी (राहुलनगर) फाट्यावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुसाट वेगाने जात असलेल्या टाटा सुमोने (क्र.एम.एच.२३ ई.३९३९) समोरुन येत असलेल्या दुचाकीला (क्र.एम एच २० बी एम ४०९१) जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार प्रकाश हुलसिंगे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान अपघाताच्या बाजुला काही महीला नळावर पिण्याचे पाणी भरत होत्या. वेळीच प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने या महीला अपघातातून बालंबाल बचावल्या. सदरील ठिकाणी असलेल्या अवैध दारु विक्रीच्या ठिकाणामुळे वारंवार अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.

   याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडु मंचरे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. youtube.com Videos - Videoodl
    Videos on YouTube are archived. YouTube has been providing a youtube to mp3 iphone variety of videos to various audiences for over 20 years. The channel Mar 21, 2017 · Uploaded by Vimeo - Vimeo - The Home Of Video

    उत्तर द्याहटवा