श्रीगोंदा / सुभाष दरेकर : तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी कारखान्याची २०२१/२२ ते २०२६/२७ या कालावधी साठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू होती.
आज अर्ज माघारी च्या दिवशी सत्ताधारी गटाचे म्हणजे माजी आ. राहुल जगताप यांच्या गटाचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. समोरच्या गटाचे सर्व उमेदवारांनी आपला पॅनेल लंगडा आहे, हे पाहून सर्व अर्ज काढून घेतले व जगताप गटाचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.
माजी आ. राहुल जगताप यांची स्व. कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. तात्यांचा वारसा राहुल जगताप यांनी पुढे चालू ठेवला. कारखान्याची बिनविरोध निवडणूक ही तात्यांना खर्या अर्थाने श्रध्दांजली ठरली आहे.
0 टिप्पण्या