जीवन हे परमेश्वराच्या कार्यासाठी, एकमेकांच्या चांगल्या कार्यासाठी जगावे- महागुरुस्वामी

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : परमेश्वरा तुमचा एक पुत्रासारखा एक देवपुत्र स्वर्गवासी झाला. त्याच्या जीवनाचे प्रतिबिंब आमच्या जीवनातून दिसावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्वकाळ जीवनावर राज्य करतो. आज स्व सीताबाई खेडेकर यांनी आपल्या सुपुत्राला परमेश्वराला अर्पण केला. त्याला कोणताही आजार नव्हता. तो बुद्धिवान आनंदी होता. त्याचे देवावर प्रेम होते.

आपली श्रद्धा किती दृढ आहे हे दर्शविण्यासाठी या आईने प्रेमाने आनंदाने श्रद्धेने आपल्या पुत्राला ख्रिस्तसेवेसाठी अर्पण केले आहे. हा वेगळाच आनद आहे. या देवपुत्राला जन्म दिल्यावर या देवपुत्राला मानवाच्या तारणासाठी दिला. स्वत:साठी काही न करता मुलामुलींना सुशिक्षित केले. हे ख्रिस्ती जीवन आहे. जोपर्यंत आपल्याला जीवन दिले आहे ते परमेश्वरासाठी व त्याच्या कार्यासाठी जगू या. एकमेकासाठी चांगले कार्य करण्यासाठी जगू या आदी प्रतिपादन नासिक धर्मप्रांताचे महागुरुस्वामी रा रे डॉ लूरडस डानियल यांनी टिळकनगर येथे स्व. सिताबाई खेडेकर यांच्या चाळीसावा दिनी केले.


याप्रसंगी व्हीकर जनरल वसंत सोज्वळ, रिचर्ड, ज्यो गायकवाड, आल्विन मिस्किटा, सतीश कदम, अब्राहम रणनवरे, मुक्तीप्रसाद, मायकल एन्थोनी, आशिष मस्के, सुभाष त्रिभुवन, रोनाल्ड, गिल्बर्ट, फ्रान्सिस ओहोळ, प्रमुख धर्मगुरू मायकल वाघमारे, संजय पटारे, Andrew जाधव आदी धर्मगुरू सहभागी झाले होते. स्व. फा. फ्रान्सिस खेडेकर यांच्या मातोश्री स्व.सीताबाई खेडेकर यांनी ८६ व्या वर्षापर्यंत आनंदाने जीवन घालविले. तिने सर्व मुलामुलींना उच्च शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. आपला एक मुलगा फा फ्रान्सिस खेडेकर नासिक धर्माप्रांतासाठी समर्पित केला व कोरोना काळात त्यांना देवाज्ञा झाली. व स्व रिटाबाई पाटोळे यानाही देवाज्ञा झाल्याने आमच्या कुटुंबातील तिघे गेल्याने आम्हाला फार दु:ख सोसावे लागले, असे कुटुंबीयांनी सांगितले. सूत्र संचालन आयोजन ख्रिस्तिना खेडेकर व कुटुंबीयांनी केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या