अहमदनगर/ जावेद शेख : सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन 2021 या वर्षाचा राज्यस्तरीय आदर्श पाणीपुरवठा कर्मचारी हा मानाचा पुरस्कार बारागाव नांदूर व इतर चौदा गाव पाणी पुरवठा योजनेचे कर्मचारी शौकतभाई इनामदार यांना देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य महंत महामंडलेश्वर जगद्गुरु डॉ. राम कृष्णदास तहवितकर महाराज नाशिक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई काचावार, ह.भ.प. राधाताई सानप, शिवशाहीर विजय तनपुरे, काणसा कारणा फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक दीपक पाटील, सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पावसे, संस्थापक यादवराव पावसे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बारागाव नांदूरचे सरपंच देशमुख, संस्थेचे सचिव बाळासाहेब गागरे, उत्तमराव म्हसे, सरपंच कर्णा जाधव, साहेबराव म्हसे, संदीप जेऊघाले उपस्थित होते.
0 टिप्पण्या