सात्रळ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

राहुरी / बाळकृष्ण भोसले - तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. जयश्री रामराव सिनगर यांना औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अर्थशास्त्र या विषयातील संशोधनाबद्दल विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त झाली आहे.

"अहमदनगर जिल्हा परिषदेच्या उत्पन्न आणि खर्चाचे अध्ययन : कालावधी २००१-०२ ते २०१०-११" या विषयीचा शोधप्रबंध प्रा. जयश्री सिनगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सादर केला होता. त्यांना औरंगाबाद जिल्ह्यामधील संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयेगावचे प्राचार्य प्रो. डॉ. शिवाजी साहेबराव अंभोरे यांनी मार्गदर्शन केले. अहमदनगर जिल्हा परिषदेमधील सांख्यिकीय माहिती संदर्भात जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनीही याकामी बहुमोल मदत केली. तसेच प्रो. डॉ. मधुकर कस्तुरे, डॉ. प्रतिमा जोगदंड यांचेही संशोधनासाठी मार्गदर्शन लाभले.

प्रा. सिनगर ह्या सात्रळ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाची धुरा सांभाळत आहेत. अध्ययन, अध्यापन, संशोधन तसेच प्रशासकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. ग्रामीण विभागातील विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्यांनी महाविद्यालयात विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

विद्यार्थी- विद्यार्थिनी प्रिय शिक्षिका श्रीमती प्रा. डॉ. जयश्री सिनगर यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाचा एक संशोधन प्रकल्प पूर्ण केला असून त्यांचे सत्तावीस संशोधनपर लेख विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, सौ. सुवर्णाताई विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या