सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार बानकर यांना जाहीर

अहमदनगर/ जावेद शेख : सरपंच सेवा संघाच्या वतीने " मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा " राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2021 हा राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी ग्रामपंचायतचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रकाश बाळकृष्ण बानकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

प्रकाश बानकर यांच्या कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती सरपंच सेवा संघाच्या वतीने संस्थापक यादवराव पावसे, सोशल मिडिया प्रमुख रोहीत पवार व राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी दिली आहे.

सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिकपणे उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तिंना सन्मानित करण्यात येते. यावर्षी २०२१ चा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार ब्राह्मणी ग्रामपंचायतचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रकाश बाळकृष्ण बानकर यांना जाहीर करण्यात आलेला आहे.

हा सन्मान सोहळा दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृहात सकाळी १२ वा. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या