हिरडगावच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी ?

श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंच संगीता भालचंद्र दरेकर यांना तिन आपत्य असल्याचा दावा दाखल केल्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरवले होते. आता या रिक्त झालेल्या जागेसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे.

या पोटनिवडणुकीत सारीका राजेंद्र दरेकर व मनिषा नवनाथ भुजबळ या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. सारीका दरेकर यांचे पती हिरडगाव सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत व मागील निवडणूकीत स्वतः याच वार्डात निवडणूक रिंगणात उभे राहून चुरशीच्या लढतीत अवघ्या चार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता.

पण यावेळी ज्या गटाकडून पराभव झाला, त्याच गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे. तसेच त्यांना मानणारा गट बरोबर आहे व मागील दुष्काळी परिस्थितीत त्यांनी या वार्डात पिण्यासाठी मोफत स्वच्छ पाणी दोन महिने दिले होते. याचाही निश्चित फायदा होईल, अशी चर्चा आहे. तसेच हे दहा वर्षा पासून समाजसेवेत व राजकारणात सक्रीय आहेत व मनिषा नवनाथ भुजबळ या राजकारणात नवख्या आहेत. पण त्यांची भावकीच्या मतावर त्यांची मदार आहेे. कोण बाजी मारणारे हे 22 तारखेला होणार्या मतमोजणी सुरू झाल्यानंतर समजेल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या